राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्यांना कायमस्वरुपी ओळखपत्र बाबत शासन परिपत्रक !

Spread the love

@Lokman.marathipepar वंदना पवार प्रतिनिधी [ Work-related identity cards for those retiring from state government service ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतुन निवृत्त होणाऱ्यांना कायमस्वरुपी ओळखपत्र देणेबाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 23.06.2017 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , राज्‍य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभांसाठी संबंधित कार्यालयात ये-जा करण्याकरीता तसेच निवृत्तीवेतनबाबतची कार्यवाही विहीत मुदतीत व्हावी तसेच शासकीय रुग्णालयातील औषधोपचार , ज्येष्ठ नागरिक म्हणून रेल्वे , बँका इ. ठिकाणी …

उपयोग करण्यासाठी तसेच शासकीय सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी म्हणून त्यांना समाजात वागणूक मिळण्याच्या दृष्टीने त्यांना कायमस्वरुपी ओळखपत्र देणेबाबत , दिनांक 23 फेब्रुवारी 2017 च्या परिपत्रकानुसार सुचना निर्गमित करण्यात आलेले आहेत .

सदर ओळखपत्राचा नमुना सदर शासन परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेला असून , यांमध्ये सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नाव , सेवानिवृत्तीच्या वेळी धारण केलेले पद , सेवानिवृत्तीचा दिनांक , आधार क्रमांक , ओळखपत्र क्रमांक , रक्तगट , विशेष आजार , मोबाईल नंबर , निवासी पत्ता या बाबींचा समावेश यांमध्ये करण्यात आलेला आहे .

Leave a Comment