सध्याच्या काही महत्वपुर्ण चालु घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@lokman.marathipeper वंदना पवार प्रतिनिधी [ Some important current affairs ] : सध्याच्या घडीच्या काही महत्वपुर्ण चालु घडामोडी या लेखांमध्ये सविस्तरपणे पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

लातुर तुरदाळास विदेशातुन मागणी : लातुर जिल्हात निर्माण होणारी तुरदाळ ही चवीला व अधिक पौष्टिक असल्याने , या तुरदाळीला चक्क ऑस्ट्रेलिया , कॅनडा व दुबईतुन मागणी येत आहे .

सुनिता विल्सम्य मार्चमध्ये पृथ्वीवर परतणार : मागील आठ महिन्यांपासून अवकाशात असणाऱ्या सुनिता विल्यम्स ह्या माहे मार्च महिन्यात पृथ्वीवर परतणार असल्याची माहिती नासाकडून देण्यात आली आहे .

नविन फौजदारी कायदे लागु होणार : राज्यात नवे फौजदार कायदे लागु करण्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राज्य सरकारला सुचना दिल्या आहेत .

भारत – अमेरिका यांच्यात द्विपक्षीय चर्चा : नरेंद्र मोदी व डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा झाली यांमध्ये आण्विक उर्जा क्षेत्रात सहकार्य वाढणार व एफ 35 लढाऊ विमान भारताला सोपविण्यास अमेरिका राजी झाले आहे .

विधवांना पुर्णांगिनी म्हणा : विधवा महिलांना यापुढे पुर्णांगिनी असे म्हणा असे राज्य महिला आयोगाची शासनाला शिफारस करण्यात आलेली आहे .

Leave a Comment