@Lokaman.marathipepar वंदना पवार प्रतिनिधी [ It will cost only Rs 20 to keep the SIM active. ] : आपण जर दोन सिम कार्ड वापरत असाल तर , आपणांस सिम ॲक्टीव्ह ठेवण्याकरीता दोन्ही कार्डला अनलिमिटेड प्लॅनचे रिचार्ज करावे लागते . परंतु आता सिम ॲक्टीव्ह ठेवण्याकरीता फक्त 20/- रुपये द्यावे लागणार आहेत .
जर आपले सिम कार्ड हे 90 दिवसांपर्यंत डि-ॲक्टीव्ह असल्यास , व त्यामध्ये प्रिपेड बॅलेन्स असल्यास सदरचा सिम कार्ड हा ॲक्टीव्ह ठेवण्याकरीता 30 दिवस मुदत वाढविण्याकरीता 20/- रुपये कापले जातील . परंतु जर बॅलेन्स नसल्यास सिम कार्ड हे पुर्णपणे निष्क्रिय होणार आहे .
तसेच ट्राय मार्फत केवळ व्हाईस प्लॅन करीताच रिचार्ज प्लॅन देणे बंधनकारक करण्यात येणार आहे . म्हणजे सध्या सर्व अनलिमिटेड प्लॅन सोबत इंटरनेट डाटा जोडून प्लॅन तयार करण्यात आलेले आहेत , तर आता कंपन्यांना केवळ अनलिमिटेड व्हाईसचे प्लॅन अस्तित्वात आणण्याचे निर्देश दिले गेले आहेत .
कारण सध्या कंपन्यांकडून रिचार्जचे प्लॅन महाग केल्याने , ग्राहकांना 02 सिम कार्ड परवडत नाहीत , यामुळे ट्रायकडून सदरचे ग्राहकांच्या फायद्याचे नियम अंमलात आणत आहेत .
जर सिम मध्ये प्रिपेड बॅलेन्स असेल तर त्यामधून 20/- रुपये कापले जातील , व सिम कार्ड निष्क्रिय देखिल होणार नाही . यामुळे ग्राहकांना चांगला फायदा होईल .
- Kind Circle मार्फत पहिली ते पदव्युत्तर पदवी स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांना 6,000/- शिष्यवृत्ती योजना !
- सध्याच्या काही महत्वपुर्ण चालु घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
- राज्यातील शासकीय / अनुदानित आश्रमशाळेच्या प्रलंबित विषयांवर बैठक संपन्न ; जाणून घ्या सविस्तर विषय !
- सर्वसामान्यांना परवडणाऱ्या चांगली सेफ्टी रेटिंग व 8 लाखांपेक्षा कमी किंमत असणाऱ्या टॉप 5 कार !
- राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्यांना कायमस्वरुपी ओळखपत्र बाबत शासन परिपत्रक !